महेश ज्ञानपीठ स्कूल ची विभाग स्तरिय मैदानी स्पर्धेकरिता निवड

Mon 14-Oct-2024,10:18 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:आसीफ मलनस हिंगणघाट

 

 

 

महाराष्ट्र शासनाचा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा यांच्या विद्यमानाने जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धचे आयोजन दिनांक 14/10/2024 ला जिल्हा क्रिडा संकुल वर्धा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महेश ज्ञानपीठ स्कूल हिंगणघाट या शाळेतील विद्यार्थिनी 

1) श्रद्धा प्रशांत काटकर अंडर 19 हिने 200 मीटर मध्ये जिल्हातुन प्रथम क्रमांक प्राप्त केला 

2) पूर्वी धर्मदास गाडवे अंडर 19 हिने 800 मीटर मध्ये जिल्हातुन प्रथम क्रमांक प्राप्त केला 

3) स्वेता योगराज कामडी हिने. 400 मीटर हडल प्रथम आणि 1500 मीटर मध्ये जिल्हातुन प्रथम क्रमांक प्राप्त केला. 

4). 100×100 मीटर रिले महेश ज्ञानपीठ स्कूल प्रथम 1) प्रतीक्षा प्रशांत गांजरे 2) पूर्वी धर्मदास गाडवे 3) स्वेता योगराज कामडी 4) श्रद्धा प्रशांत काटकर 

 मध्ये जिल्हातुन प्रथम क्रमांक प्राप्त केला

5). 400 × 400 मीटर रिले महेश ज्ञानपीठ स्कूल प्रथम  

1) प्रतीक्षा प्रशांत गांजरे 2) पूर्वी धर्मदास गाडवे 3) स्वेता योगराज कामडी 4) श्रद्धा प्रशांत काटकर. जिल्हातुन प्रथम क्रमांक प्राप्त केला

 या विद्यार्थिनीने आपल्या खेळाचे उत्कृष्ट असे प्रदर्शन करून विभागीय स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले आहे 

 मिळालेल्या यशाबद्दल 

 त्यांनी या विजयाचे श्रेय शाळेचे संचालक मंडळाचे अध्यक्ष गिरधरबाबु राठी, संचालक मंडळाचे सर्व सदस्य, प्राचार्या वैशाली पोळ, उपप्राचार्य दिगंबर खटी, जिल्हा क्रीड़ा अधिकारी आशा मेश्राम , क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे क्रीड़ा अधिकारी निमगडे सर, क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी तालुका संयोजक खांडरे सर तथा क्रीड़ा शिक्षक मुस्तफा हबीब बख्श, सचिन मुळे, प्रणिता चिंतलवार व सर्व शिक्षक वृंदाना दिले.

त्यांचे यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.